सोलापूर :- राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सोलापूरच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक जण आहेत. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सोलापूर च्या पालकमंत्रीपदी निवड व्हावी यासाठी सोलापूर येथील प्रसिद्ध असलेले शहनशाहे ए शाहजहुर दर्गा येथे युवा नेते शहाबाज ( किंग ) मुत्तवली यांनी चादर चडवून प्रर्थना केली आहे.
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी 2019 साली भाजप प्रवेश केला. 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, विधानसभा पोटनिवडणुक आदी निवडणूकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आण्यात ही त्यांनी महत्त्वाची भूमिका होती. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सहकार क्षेत्रातील चांगला अनुभव आहे.
त्यामुळे आ. रणजित दादांना पालकमंत्रीपदी निवड कल्यास भाजपचा फायदाच होईल. तसेच अत्यंत महत्त्वाची असलेली कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेचा प्रश्नही मार्गी लागेल यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड व्हावी यासाठी शहनशाह ए शाहजहुर दर्गावर युवा नेते शहाबाज ( किंग ) मुत्तवली व किंग फ्रेंडस सर्कल च्यावतीने चादर चडवून प्रार्थना केली.
यावेळी मतीन नालबंद, सरफराज चांदा, मुजाहिद हिरापुरे, नयन गायकवाड, ख्वाजा, आदित्य विजापूरे, पिरसाहेब शेख, जुबेर कुरेशी, शाहिद रंगरेज साकिब, खाजा लोकापल्ली आदी जण उपस्थित होते.