पिलीव प्रतिनिधी –
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसेवा तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी पिलीव यांच्या वतीने रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकसेवा तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष सोमनाथ भैस- राजपूत ,उपाध्यक्ष शाहरुख पठाण ,सचिव वाजिद शेख यांनी दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर जीवन जानकर ,आरिफ भाई पठाण नितीन माळी, संग्राम पाटील ,भजनदास चोरमले अमोल मदने ,मोहन करांडे ,संतोष रजपूत राजाभाऊ जामदार, कुमार भैस, शिवराज पुकळे ,अनिल खटावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.