नातेपुते, स्वराज्य वार्ता टीम
माळशिरस विधानसभेचे सदस्य तथा आ. राम सातपुते यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 4 जुलै रोजी मोजे नातेपुते ता. माळशिरस येथील नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचे पत्र दिले होते या पत्राची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत व विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ लक्ष देऊन नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने नातेपुते नगरपंचायत व नागरिकांच्या वतीने आ राम सातपुते यांचे विशेष आभार मानले जात आहेत.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नातेपुते नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषतः लक्ष देऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ राम सातपुते यांनी केलेल्या मागणीचा विचार करून तात्काळ साडेचार कोटी रुपये मंजूर केले असून यानंतर माळशिरस नगरपंचायतीच्या विविध कामांसाठीही निधी देण्याचे आ राम सातपुते यांना अस्वस्थ केले नातेपुते नगरपंचायतीच्या प्रभागांमधील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, मंदिरासमोरील उद्यानाचे सुशोभीकरण करणे, सभामंडपबांधणे, स्मशानभूमी कंपाउंड व सुशोभीकरण करणे ,अंडरग्राउंड गटार तयार करणे, वडार समाजासाठी शौचालय बांधणे ,वडार समाज सभागृह सुशोभीकरण करणे ,कॅनॉल वरील रस्ते तयार करणे ,ज्या प्रभागांमध्ये रस्ते करणे आवश्यक आहे व ज्यांची मागणी झाली आहे अशा सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामासाठी हे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली .
ठाकरे व पवार सरकारच्या काळात भाजपच्या आमदारांना निधीबाबत सापत्न वागणूक दिली जात होती परंतु राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे व फडणवीस सरकारच्या कार्यकाळात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेल्या मागणीचा विचार करून माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सढळ हाताने शिंदे व फडणवीस सरकार मदत करीत असून ही मदत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करीत आहे.
आ. राम सातपुते ,सदस्य माळशिरस विधानसभा मतदारसंघ